Saturday, 29 August 2015

आर्वीत पारालॅम ग्लोबल फॅक्‍टरीला आग

आर्वी (जि. वर्धा)- येथील पारालॅम ग्लोबल फॅक्‍टरीला मंगळवारी (ता. २५) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ही आग अद्यापही आटोक्‍यात आलेली नाही. यात फॅक्‍टरीतील अब्जावधी रुपयांच्या मशीन जळून खाक झाल्या. 

या फॅक्‍टरीत प्लेन व प्री. लॅमिनेटेड पार्टिकल बोर्डाची निर्मिती केली जाते. याकरिता संजय अग्रवाल यांनी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र बसविले आहेत. पार्टिकल बोर्ड युनिटच्या मुख्य भागाकडून ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करून पार्टिकल बोर्ड प्रेस, स्पॅडर यंत्र, कटिंग यंत्र आदी यंत्रांना आपल्या कवेत घेतले. अद्यापही आग धगधगतच आहे. आर्वी नगर परिषदेचे अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तर, पुलगाव येथील डिफेन्स, धामणगाव, हिंगणघाट, चांदूर (रेल्वे) येथील अग्निशमन दल रात्री तीन वाजता पोहचले. आग आटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

No comments:

Post a Comment