Thursday, 27 August 2015

भारतीय संघात ओझा, नायरची वर्णी

कोलंबो -श्रीलंकाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मध्य प्रदेश रणजी संघाचा यष्टीरक्षक नमन ओझा आणि कर्नाटक संघाचा फलंदाज करुण नायर यांना देण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. दुसरी कसोटी खेळत असलेल्या मुरली विजय आणि रिद्धीमान साहाच्या जागेवर ओझा आणि नायरला संघात सामील करण्यात येणार आहे. साहाच्या जांगेच्या खालच्या जागेत मांसपेशी दुखावल्या गेली आहे. तर विजयला पहिल्या दुखापतीचा पुन्हा त्रास होत आहे. त्यांना दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment