महाराष्ट्र लाईव्ह वृत्तः-
पुणे : पुणे येथील राष्ट्रभक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अनाथांसाठी या वर्षांच्या दिवाळी साठी " मुठभर धान्यदान " उपक्रम राबवण्यात आला होता, याद्वारे सदस्यांच्या माध्यमातून धान्यदान व मिठाई गोळा करून दापोडी, पुणे येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमात राष्ट्रभक्ती चे सदस्यांनी अनाथाश्रमातिल विध्यार्थी आणि सर्व कर्मचाऱ्याना मिठाई देवुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सुनिल गोरे यांनी सर्व विध्यार्थंना शिक्षण, आरोग्य विषयी महत्व सांगितले व दिवाळी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अनाथांश्रमाचे सर्व विध्यार्थी, संचालक श्री सूर्यवंशी सर आणि इतर स्टाफ उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रभक्तीचे श्री नील जाधव, किरण फरांदे, विजय आटपाडकर, अमोल माने, राजेश केदारी, अशोक वीर, आनंद खताळ, योगेश आवताडे, बंटीभाऊ शेळके, अतुल गवळी, सुनिलकुमार सुुळ, गोविंद दाभोळकर, विनायक खाडे, गणेश जाधव, आनंद दाभोळकर, सचिन नीलकंठ, सुनिल घुमे, दयानंद शिंदे, तुषार कदम, मनोज निकम, संतोष दरेकर आदींचे सहकार्य लाभले व उपस्तिथ होते. आभार प्रदर्शन डॉ. सत्यवान गडदे यांनी केले.
Friday, 13 November 2015
राष्ट्रभक्ती सामाजिक संघटना आयोजित "मुठभर धान्यदान" अनाथांसाठी स्तुत्य उपक्रम सम्पन्न.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment