
सोलापूर प्रतिनिधी : अमीर मुलानी
महाराष्ट्रातील विधानसभेचा बिगुल नुकताच वाजला असून अनेकांनी आप आपली सेटिंग आप आपल्या परीने उमेदवारी मिळविण्यासाठी सर्व ताकत पणाला लावून सुरुवात केली असून अनेक मात्तबर दिग्गच नेते माळशिरस विधानसभा निवढणुक लढविण्यासाठी इच्छुक झाले आहेत. परंतु माळशिरस विधानसभेचा उमेदवार हा माळशिरसचा स्थानिक असावा अशी मागणी माळशिरस तालुक्यातील जनतेतून होत आहे. माळशिरस विधानसभेची निवडणूक जनतेचे श्रद्धा स्थान धडाडीचे नेतृत्व समजले जाणारे नगमाताई शिवपालक यांचे नाव पुढे येत आहे . नगमाताई शिवपालक यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेची कामे करून दिलेली आहेत .तालुक्यातील तळागाळातील जनतेशी त्यांचा मोठा संपर्क आहे. माळशिरस तालुक्यातील स्थानिक उमेदवार म्हणून नगमाताई शिवपालक यांनाच उमेदवारी मिळावी अशी तालुक्यातील जनतेची मागनी असल्यामुळे नगमाताई शिवपालक यांनी वरिष्ठ पातळी वर उमेदवारी मिळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केले असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment