Saturday, 29 August 2015

महापालिका दिवाळखोर नव्हे, कोट्यवधींची मालक

जळगाव - महापालिका दिवाळखोर झाल्याने बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू आहे, मात्र दुसरीकडे सत्ताधारी गटातर्फे महापालिकेच्या शहरातील विक्री करण्यायोग्य मालमत्तांची माहिती गोळा करून त्यांची व्हॅल्युएशन काढण्यात येत आहे. महापालिका ही दिवाळखोर नव्हे तर कोट्यवधींची मालक आहे, जागा विक्रीस परवानगी दिल्यास त्या निधीतून कर्जफेडीसह भविष्यातही विकास होऊ शकतो.ही सत्य परिस्थिती शासनाला दाखविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जळगाव महापालिकेवर ‘हुडको’ चे असलेले कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी खानदेश विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनीही कर्जफेड करण्यासाठी काही प्रस्ताव सुचविले.

No comments:

Post a Comment