Saturday, 29 August 2015

बालविवाह लावणार्या समाजसेविकांवर गुन्हा दाखल

जळगाव - शहरातील समाजसेविका यांनीच एका अल्पवयीन मुलाचा विवाह जबरदस्तीने लावल्याचे पोलीसात समाजसेविकेंविरूध्द दि.२७ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
एरंडोल तालुक्यातील वराड येथील विशाल लक्ष्मण पाटील व धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील मुलीच्या माध्यमातुन विशालचा बळजबरीने रितू व्यास, डॉ.हेमलता रोकडे या दोघांनी दि.१ जुलैपासून अल्पवयीन विशाल पाटील याला तू मुलीशी लग्न कर नाहीतर तू दोन लाख रूपये दे असे धमकवून पैशाची मागणी केली. त्यानंतर विशाल याचे जबरदस्तीने मुलीशी दि.३ जुलै रोजी बळीराम मंदिरात लग्न लावले. यावेळी बिंदीया नांदेडकर, जगदीश नेवे, अजित नांदेडकर, वंदना नेवे, राजकुमारी बाल्दी, भारती पाथरकर, मंगला नगरकर व इतर दोन महिला समितीच्या सदस्या यांच्या उपस्थितीत विवाह लावण्यात आला. ३ जुलै रोजी २०१२ रोजी २१ वर्षे पुर्ण नसतांना समाजसेविकांनी माझ्या मुलाचे बळजबरीने लग्न लावून दिल्याची तक्रार विशाल याचे वडील लक्ष्मण देवराम पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. सुपेकर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची दखल घेत डॉ.सुपेकर यांनी याप्रकरणी दि.२७ ऑगस्ट रोजी शहर पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुलाचे वडील लक्ष्मण पाटील यांच्या तक्रारीवरून बिंदीया नांदेडकर, जगदीश नेवे, अजित नांदेडकर, वंदना नेवे, राजकुमारी बाल्दी, भारती पाथरकर, मंगला नगरकर व इतर दोन महिला समितीच्या सदस्या यांच्याविरूध्द कलम ३८४, ५०६ (ब), ३४ भादंवी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६चे कलम १०,११ (१), १२ (अ) (ब) या कलमांनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि आशिष रोहि करीत आहेत.

No comments:

Post a Comment