गडचिरोली -- गेल्या आठ महिन्यापासून पगार न झाल्याने तसेच विविध मागणीला घेऊन गडचिरोली जिल्ह्यात एकमेव असलेल्या नामदेवराव पोरेड्डीवार इंजिनियरिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी धानोरा मार्गावरील गडचिरोली पासून ५ किमीच्या अंतरावर २००९ ला नामदेवराव पोरेड्डीवार इंजिनियरिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. येथे गडचिरोली , भंडारा,चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास ७०० विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेत आहेत.येथे ६५ कर्मचारी काम करतात कॉलेज प्रशासनाने गेल्या आठ महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार दिलेले नाही अनेकदा कॉलेज प्रशासनाला विनंती करूनही कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नाही त्यामुळे टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ अशोसियशनच्या वतीने आज पासून कॉलेज समोरच बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.आणि जो पर्यंत पगार होणार नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिले आहे. कॉलेज प्रशासन व कर्मचारी यांच्या झगड्यात मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

No comments:
Post a Comment