Saturday, 29 August 2015

बाळासाहेब सूर्यवंशी यांचे उपोषण मागे

कर्जत - पालकमंत्री ना. राम शिंदे याचेवर विश्वास टाकून आज आपण उपोषण सोडत असून त्यांनी एक महिन्याची मुदत दिली आहे मात्र दोन महिन्यात या प्रश्नावर योग्य तोडगा न निघाल्यास आपण पुन्हा सर्वाबरोबर उपोषण करू असा इशारा गेली सात दिवसा उपोषण करणारे ७२ वर्षीय जेष्ठ नागरिक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिला. आज त्यानी पालकमंत्री ना. राम शिंदे याचे हस्ते आपले उपोषण स्थगित केले. 
कर्जत तालुक्यातील कोंभळी परिसरातील गुरवपिंपरी व इतर २१ गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी तुकाईचारी मंजूर करून त्यामधून गुरवपिंपरी तलावात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी गुरवपिंपरी येथे ७२ वर्षीय जेष्ठ नागरिक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दि २० ऑगष्ट पासून ग्रामदैवत रामेश्वराचे मंदिरासमोर उपोषण सुरु केले होते त्या उपोषणास परिसारातील विविध गावकर्यांनी मोठा पाठिंबा दिला होता. मात्र प्रशासनाने योग्य पद्धतिने प्रतिसाद न दिल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत होते तर गेली ६ दिवस होऊन तालुक्याच्या लोकप्रतिनिधी असलेले व सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे उपोषणाकडे फिरकले नव्हते. निवडून आल्यानंतर पहिल्या बैठकीत तुकाईचारीचा प्रश्न मिटवू असे आश्वासन प्रचारात दिले होते त्यामुळे ना. शिंदे बाबत नागरिकात चीड निर्माण होऊ लागली होती. अखेरीस आज सातव्या दिवशी ना राम शिंदे यांनी थेट गुरवपिंपरी गाठत उपोषणार्थी सुर्यवंशी याची भेट घेतली व त्याचेशी याविषयावर चर्चा केली तुकाई चारी प्रश्नावर पाठपुरावा करून जीर्ण झालेल्या फाईली व कागदपत्रासह एक एक कागद सुर्यवंशी जेव्हा मंत्री महोदया पुढे मांडू लागले तेव्हा या विषयात सूर्यवंशी याचा किती सखोल अभ्यास आहे हे पहावयास मिळत होते. ना. शिंदे यांनी निवडून आल्यावर मंत्रालयात लावलेल्या पहिल्या बैठकीत याच जेष्ठनागरिकास जी अपमानास्पद वागणूक मिळाली होती ती त्यांनी थेट मंत्र्यांना बोलून दाखवली असता त्यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे सदरची बैठक योग्य पद्धतीने होऊ शकली नसल्याचे शिंदे यांनी सूर्यवंशी यांना सांगत आपण दि १ सप्टे रोजी मुंबईत फक्त ५ व्यक्ती बरोबर या मी आपणाला जलसंपदा मंत्र्याची भेट घालून बैठक ठरवून घेतो व बैठ्काच्या माध्यमातूनच तुकाई चारीचा प्रश्न सोडवता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ना. शिंदे यांनी आपण शासनाला तुकाई चारीचा षशीफेरसर्वे करायला लावले आहे असे म्हटले असता अशा पद्धतीचे तीन सर्व्हे याअगोदर झाले असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगत त्याचे शासकीय नकाशेच त्याचे समोर मांडले मात्र ना शिंदे यांनी आपणच पुन्हा सर्व्हे करायला भाग पाडले असल्याचे सांगत हा प्रश्न सुटावा असे आपल्याला वाटते व तालुक्याचे प्रश्न सुटले तर आपले काही नुकसान होणार नाही मला हि वाटते कि आपल्याकडे सह्या चे सर्व अधिकार असावेत व तालुक्याचे सर्व प्रश्न तातडीने सुटावेत मात्र तसे होऊ शकत नाही. तालुक्याचे अनेक प्रश्न आपण मार्गी लावले असून जी कामे आपल्या कडून होतील तीच्याच बाबतीत आपण शब्द देतो अन्यथा शब्द देत नाही असे म्हणत तालुक्याच्या विकासासाठी आपण जे जे काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे सांगत आपण पाच प्रमुख व्यक्तीनी यावे यावेळी गुरवपिंपरीच्या तलावात पिण्यासाठी पाणी सोडणे व तुकाईचारीचा प्रश्न अशा दोनच मागण्यांबाबत आपण अधिकार्याची बैठक घेऊ अधिकारी हे कायदा दाखवून नकारात्मकच असतात ते आपल्या हितासाठी कसे बसवता येईल यासाठी सरकार असते असे सांगत मला हि वाटते एखादे मोठे काम माझे हाताने व्हावे ज्यामुळे लोक मला पुढचे पाच पंचवीस वर्ष लक्षात ठेवतील असे म्हणत ना. शिंदे यांनी हा प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द देत सात दिवसापासून सुरु असलेले उपोषणा सोडावे अशी विनती केली असता सूर्यवंशी यांनी सर्व ग्रामस्थाना विचारत मला तुमच्यावर विश्वास असून तुम्ही तुमच्या शब्दाला जागाल व मला तुमच्या विरुद्ध उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये असे स्पष्ट शब्दात सांगत आपले उपोषण मागे घेण्यास होकार दिला यानंतर ना. शिंदे याचे हस्ते लिंबू पाणी घेत आपले उपोषण स्थगित केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव राउत, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर याचे सह डॉ रामदास सूर्यवंशी, तात्यासाहेब वडवकर, कलंदर सय्यद, प्रल्हाद गंगावणे, पोपट लोंढे, नंदू नवले, अंकुश टकले, अशोक टकले, सचिन सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी, संदीप टकले, श्रीधर टकले, अजय मांढरे, बबन दळवी, कैलास हुमे, कल्याण पोकळे, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप इंगळे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आदिसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी विष्णुपंत टकले यांनी उपस्थितांना झालेल्या चर्चेची माहिती दिली तर मनोहर रासकर यांनी शेवटी आभार मानले. पालक मंत्री उपोषण सोडण्यासाठी आले असताना महसूलचे जिल्हाधिकारी याचे सह स्थानिक तहसीलदार हे सुधा उपस्थित नसल्याने याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. 

No comments:

Post a Comment