Saturday, 29 August 2015

विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

पंढरपूर - उजनी धरणातून उजनी व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, सोलापूरसाठी धरणातून नदीद्वारे पाणी सोडण्यात येऊ नये, सोलापूर शहरासाठी समांतर पाईपलाईन टाकून पाणी न्यावे अशा मागण्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील भीमा पाटंबधारे कार्यालय परिसर दणाणून सोडला. उजनीच्या पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे ,पिण्याच्या पाण्यासाठी ,जानावरांच्या चार्यासाठी उजनी डावा व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी पंढरपूर येथील लघु पाटबंधारे मुख्यालय पंढरपूर कार्यालया वर मोर्चा काढण्यात आला. सोलापूरसाठी पिण्याचे पाणी सोडण्यासाठी २० टीएमसी पाणी सोडावे लागते तेंव्हा १ टीएमसी पाणी मिळते .आमचा सोलापूरला पाणी सोडण्यासाठी विरोध नाही परंतु आमचे हक्काचे पाणी आम्हला मिळाले पाहिजे. आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. ऑगस्ट महिना सरत आला तरी पावसाने आपली वक्रद्रष्टी कायम ठेवल्यामुळे भीषण परिस्थीतीचा सामना ग्रामीण जनतेला करावा लागत आहे. एकीकडे शेतीसाठी पाणी नाही अन् दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहीरी आटल्या आहेत.तर शेतातील उभी पिके जळुन गेली आहेत. भाजीपाल्याच्या पाणी देणे शक्य नसल्याने शेतकर्‍यांचे रोजचे उत्पन्न बंद पडले आहे. त्यामुळे भिषण परिस्थीती निर्माण झाली आहे . श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने भीमा पाटबंधारे कार्यालय येथे गुरूवारी अचानकपणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिलांही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्ते कार्यालयाच्या ठिकाणी येणार याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी बंदोबस्त वाढविला होता. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटकाव करून इमारतीच्या बाहेर रोखले. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाअध्यक्ष मोहन आनपट,व कार्यकर्ते घोषणा करीत मोर्चा मध्ये सामील झाले होते .मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

No comments:

Post a Comment