Saturday, 14 November 2015

गरिबीला कंटाळून नांदेडमधील महिलेची आत्महत्या.... आईच्या विरहाने मुलानेही संपवली जीवनयात्रा...

           नांदेड : नांदेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. गरिबीला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केलीय. तर तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानंही आपला जीवनप्रवास संपवलाय.


             नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या या घरात शोककळा पसरलीय. कारण या घरातल्या दोन व्यक्तींनी मृत्यूला कवटाळलंय... मुमताज अत्तार. वृद्ध आई आणि आपल्या लेकासह याच घरात राहत होती. मुलगा पोटात असतानाच पती सोडून गेला. मात्र मुमताजनं मोठ्या हिंमतीनं धुणीभांडी किंवा मिळेल ते काम करुन मुलगा अस्लमला शिकवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र कामही मिळत नाही. महागाई वाढलेली अशात जगायचं कसा असा प्रश्नही तिला सतावत होता. याच विवंचनेत एका पूलावरुन उडी मारुन तिनं आपला जीवनप्रवास संपवला.

No comments:

Post a Comment