Tuesday, 17 November 2015

पंढरपूरमध्ये माजी मुख्यमंत्री श्री.नारायण राणे यांच्या उपस्थितीत ऊस परिषद व शेतकरी मेळावा संपन्न

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज 

दि.17 नोव्हेंबर 2015
               आज पंढरपूरमधील तनपुरे महाराज मठामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य ऊस परिषद व शेतकरी मेळावा संपन्न झाला.  


           या निमित्ताने पंढरीत आलेले श्री.राने यांनी श्री.विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.  मेळाव्यात जमलेल्या प्रचंड शेतकर्‍यांच्या समुदायासमोर बोलताना  त्यांनी  शेतकर्‍यांच्या मागण्यासंदर्भात आपले मत मांडले.  

          यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळनवर, स्वाभिमानी चे सागरदादा यादव, मनसे चे दिलीपबापु धोत्रे, संभाजी ब्रिगेड चे स्वागतदादा कदम, दिपकदादा वाडदेकर, यांचेसह अनेक मान्यवर, बळीराजा शेतकरी संघटनेचे इतर नेते, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. 










छाया सौजन्य:- उमेश टोमके व राजु बाबर

No comments:

Post a Comment