पंढरपूर (प्रतिनिधी)- आंबेचिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पदवीधरांच्या नेत्या
सौ.शैला धनंजय गोडसे यांची व उपसरपंचपदी शकीलाबी कादरभाई शेख यांची निवड करण्यात आली. आंबेचिंचोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कपीले साहेब व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक फडतरे यांनी
काम पाहिले.सरपंचपदासाठी आ.भालके-महाडिक गटातर्फे सौ.शैला गोडसे यांनी तर परिचारक गटातर्फे सौ. उषा पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. आ.भारत भालके, खा.धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखालीआंबेचिंचोली ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यात आली होती. त्यामध्ये 9 जागांपैकी 7 जागी विजय संपादन केला होता. यावेळी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदानाद्वारे निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सौ.शैला गोडसे यांना 7 मते मिळाली तर सौ. उषा पाटील यांना 2 मते
मिळाली. त्यानुसार गोडसे यांची निवड करण्यात उपसरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने शकीलाबी शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पदवीधरांच्या नेत्या शैला गोडसे यांच्या ग्रामपंचायतीतील प्रवेशानंतर सरपंच, उपसरपंच
निवडीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सौ.गोडसे यांची निवड झाल्यानंतर
कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कदम, स्वप्निल राजमाने, मधुकर बैरागी, प्रभाकर जाधव, पार्वती यादव आदि उपस्थित होते.
सदर निवडीनंतर आ.भारत भालके यांनी सरपंच यांच्यासह सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी पवनराजे महाडिक, राजेंद्र कदम, जीवन पाटील, विलास आवताडे, विनोद कदम, सिध्देश्वर पाटील, आनंद जाधव, गणेश पाटील, तुकाराम राजमाने,
महादेव यादव, तानाजी गोडसे, विराम पाटील, श्रीकांत कांबळे, बिभीषण राजगुरू, बाळासाहेब जाधव, सुनिल राजगुरू, सुधाकर जाधव, कमलाकर कदम, विशाल जाधव, नईम मुजावर यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment