महाराष्ट्र लाईव्ह वृत्त:
(शितल कलढोणे)
दि.23 नोव्हेंबर 2015
मुंबई, दि.23 (महाराष्ट्र लाईव्ह )
इसिस या दहशतवादी संघटनेने एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी दिली आहे .
त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ,
विमानतळ प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
इसिसच्या दहशतवाधांनी एअर इंडियाच्या काॅलसेंटरला ही धमकी दिली .
येत्या 28 नोव्हेंबर ला एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली .
त्यानंतर विमानतळ प्रशासनाने तातडीने हायअलर्ट जारी केला. त्याचबरोबर ठाणे शहरातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी इसिसच्या धमकीच्या पाक्षभूमीवर एअर फ्रान्सच्या विमानांचे एमर्जन्सी लँडींग करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment