पंढरपूर दि.24- गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी श्री विठ्ठल मंदीराला भेट देवून श्री विठ्ठल-रुक्मीणी मातेचे दर्शन घेतले. विधिवत पुजेनंतर श्री. मेहता यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीरे समितीच्या वतीने मंदीरे समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तहसिलदार गजानन गुरव, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदिर समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment